भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू, प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे एका वृद्धेचा बळी गेला आहे. खुब्याच्या शस्त्र्ाक्रियेमुळे अंथरुणावर पडून असलेल्या सोफिया पठाण (वय 85) यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला होता. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान, शनिवारी (दि. 17) त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली असून, प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

खुब्याच्या शस्त्र्ाक्रियेमुळे अंथरुणावर उपचार घेत असलेल्या सोफिया पठाण या त्यांच्या घरात झोपल्या असताना त्यांच्या घरात घुसलेल्या शुक्रवारी (दि. 9) पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या गालाचा लचका तोडला होता. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गालावर झालेल्या जखमेमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, शनिवारी (दि.17) त्यांचा मृत्यू झाला.

याआधी भटकी कुत्री पकडण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाच्या निषेधार्थ अधिकाऱयांना साडी-चोळी आणि बांगडय़ांचा आहेर देऊन अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला होता. आता वृद्धेच्या मृत्यूनंतर हा केवळ अपघात नसून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याप्रकरणी संबंधित
नगरपंचायत प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी पठाण यांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.