पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूने जपानच्या हिना अकेचीचा तीन गेमच्या रोमांचक सामन्यात 21-10, 20-22, 21-16 असा पराभव केला. एक तास आणि 13 मिनिटे चाललेल्या या सामन्यात 31 वर्षीय सिंधूने संयम आणि अनुभव दाखवला. या वर्षी तिची ही दुसरी अंतिम फेरी आहे. यापूर्वी तिने जुलैमध्ये जपान ओपनचे विजेतेपद पटकावले होते. आता या विजेतेपदासाठी तिचा सामना दक्षिण कोरियाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अन से यंगशी होईल.