
मुंबईकरांची दिवाळी गोड आणि आनंदात साजरी व्हावी यासाठी शिवसेनेने विविध उपक्रमाचे आयोजन केले. नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेने मदतीचा हात पुकरत ठिकठिकाणी दिवाळी फराळ साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर काही प्रभागात नागरिकांना सुगंधित उटणे व भेटवस्तू देण्यात आल्या.
ताडदेवमध्ये फराळ साहित्य वाटप
शिवसेना शाखा क्रमांक 215 व जय भवानी प्रतिष्ठानतर्फे ताडदेवमधील नागरिकांना अल्पदरात दिवाळी फराळ साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेना उपनेते व भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांच्या फाराने ताडदेव येथील नागरिकांना 100 रुपयांत रवा, मैदा, साखर, चणाडाळ, वनस्पती तूप व पोहे (प्रत्येकी एक किलो) असे गिफ्ट पॅकचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, अरुंधती दुधवडकर, विधानसभा प्रमुख भैरू चौधरी (जैन), अरविंद बने, सुरेखा उबाळे, विजय पवार, सुप्रिया शेंडेकर उपस्थित होते.
मोफत शिधावाटप
शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 200 येथील नागरिकांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या फाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते नागरिकांना फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख-नगरसेविका श्रद्धा जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत कोपडे, सुनीता आयरे, मुपुंद पडयाळ, दत्ता घाटकर, प्रशांत घाडीगावकर, विलास राणे, सुरेश काळे, विश्वास निमकर, नितीन पेडणेकर, निलेश बडदे, समीर दळवी, वंदना मोरे, कल्पेश शहा आदी उपस्थित होते.
सुगंधित उटणे वाटपाचा शुभारंभ
परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठान तर्फे दिपावलीनिमित्त सुगंधित उटणे वाटपाचा शुभारंभ मंडळाचे संचालक व शिवसेना सचिव सुधीर साळवी यांच्या हस्ते झाला. यावेळी मंडळाचे संस्थापक आनंद गांवकर, प्रभाकर मोरजकर, सूर्यकांत शिंदे, आबा फाटक, रविंद्र ओटवकर, प्रफुल्ल गांवकर, अभिषेक दहीबावकर, अथर्व सावंत, अभिषेक गवाणकर, मैथिली सुर्वे उपस्थित होते. सुधीर साळवी, आमदार महेश सावंत, नगरसेविका उर्मिला पांचाळ, उपनेते संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आदिवासी पाडय़ातील गरजूंसोबत दिवाळी
घाटकोपर पूर्वच्या शूरवीर बाजीप्रभू मंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील गरजू नागरिकांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. खालापूरमधील डोणवतच्या आदिवासी पाडा नाना नगर, खारीवली येथे हा उपक्रम पार पडला. यावेळी शूरवीर बाजीप्रभू मंडळाचे संस्थापक नाना उत्तेकर, पॉप्युलर हॉटेलचे मालक संदीप नायक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष नेहरकर, सल्लागार प्रकाश वाणी आदी उपस्थित होते.





























































