शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत शाळांना टाळे लावू नका – हायकोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवणीतील 14 प्राथमिक शाळांना टाळे लावण्याची कारवाई यंदाचे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत (मार्च-2027) करू नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी महापालिकेला दिले. या शाळांमध्ये झोपडपट्टीतील सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना दिलासा मिळाला आहे. या शाळा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत पालिकेने त्या बंद करण्याची नोटीस जारी केली. त्याविरोधात नाझीर खान यांनी जनहित याचिका दाखल केली. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.