
नावातील चूक, जन्मतारखेतील बदलामुळे पीएफ क्लेम अडकतो. ईपीएफओच्या ज्वॉइंट डिक्लेरेशन सुविधेचा वापर करून पीएफ खात्यात संबंधित माहिती दुरुस्त करता येते.
सर्वात आधी ईपीएफओच्या अधिकृत सदस्य पोर्टलवर जा. या ठिकाणी तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN), त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगीन करा.
पोर्टलच्या डॅशबोर्डवर Joint Declaration Facility या पर्यायाची निवड करा. तुम्हाला कोणती माहिती दुरुस्त करायची आहे, तो पर्याय निवडा आणि संबंधित माहिती दुरुस्त करा.
योग्य वैयक्तिक माहिती, नोकरीच्या तपशीलात योग्य ती सुधारणा केल्यावर तो बिनचूक आहे का, त्याची खातरजमा करा. आवश्यक कागदपत्रे, आधारकार्ड स्कॅन करून अपलोड करा.
आता तुम्ही जी दुरुस्ती केली आहे आणि जी माहिती अपडेट केली आहे, ती पुन्हा एकदा तपासा. आता अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा.





























































