अकवान चक्रीवादळाचा विदर्भाला फटका, चंद्रपुरात सकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागरातील ‘अकवान’ चक्रीवादळाचा प्रभाव चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून, अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. चंद्रपूरसह नागपूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

हा पाऊस आजपुरताच राहण्याचा अंदाज असून, चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर थंडीचा जोर वाढेल, असे मत हवामान अभ्यासक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून, आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि शेतमजुरांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.