शेख हसीना परतल्यास ताबडतोब अटक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी पंतप्रधान शेख हसीना बांगलादेशात परतल्यास त्यांना ताबडतोब अटक केली जाईल व त्यांची रवानगी तुरुंगात केली जाईल, असा इशारा बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी बांगलादेशात झालेल्या जेन-झी उठावानंतर शेख हसीना यांनी देश सोडून पलायन केले होते. त्या सध्या हिंदुस्थानच्या आश्रयाला आहेत. हिंदुस्थानने हसीना यांचे प्रत्यार्पण करावे यासाठी बांगलादेशातील तारीक रेहमान सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थान सरकारने अद्याप त्याबाबत ठोस पावले उचललेली नाहीत. त्यातच शेख हसीना स्वतः डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बांगलादेशात राजकीय वातावरण तापले असून रेहमान सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.