पालिकेच्या उद्यानांवर आता एआय सीसीटीव्हीची नजर; प्रत्येक वॉर्डमध्ये होणार थेट प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी आता उद्यानांत ‘एआय सीसीटीव्ही’ बसवण्यात येणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण 24 तास सेंट्रल कंट्रोल रूमसह प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या कंट्रोल रूमध्ये उपलब्ध राहणार आहे. सुरुवातीला  प्रत्येक वॉर्डमधील एक ते दोन उद्यांनात हे ‘एआय सीसीटीव्ही’ बसवण्यात येतील. यासाठी प्रतिपकॅमेरा 50 लाखांपर्यंतचा खर्च येणार असून सुमारे 6 कोटींचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे.

पुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केट सिटी मॉलजवळील पालिकेच्या स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात 20 नोव्हेंबर रोजी 12 ते 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलांच्या टोळीने तरुण-तरुणीला हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या उद्यानांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका उद्यानांतील सुरक्षेमधील गंभीर त्रुटींबाबत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे पालिकेने आता उद्यानांच्या सुरक्षेसाठी एआय आधारित अद्ययावत पॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अशी आहे पालिकेच्या उद्यानांची स्थिती

महापालिकेची मुंबई शहर आणि पूर्व–पश्चिम उपनगरात सुमारे 1436 उद्याने, मैदाने आहेत. या उद्यानांची सुरक्षा कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जात असल्याचे पालिकेकडून सांगितले जाते. मात्र अनेक उद्यानांत असणाऱया तकलादू सुरक्षेवरून पालिकेवर नेहमीच टीका होत असते.

या पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक वॉर्डमध्ये एक या प्रमाणे एआयवर आधारित पॅमेरे बसवण्यात येतील. यासाठी 25 लोकेशन निश्चित करण्यात आली आहेत. झोपडपट्टी विभाग, इमारती विभागांमध्ये कॅमेऱ्यांच्या माध्यमातून येणाऱया परिणामांच्या आधारे मुंबईभरात हा प्रकल्प राबवण्यात येईल.