जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता ऑनलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने आता जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्रासाठी आता  केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. या ऑनलाइन  अर्जावर जात पडताळणी समितीला 60 दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे.

सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय्य विभागाने आज यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. विभागाने पुण्यातील  बार्टी संस्था  आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्याने ‘कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी इन्फॉर्मेशन सिस्टीम’ ही प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे अर्ज, कागदपत्रे सादर करणे, अर्जाची स्थिती तपासणे आणि प्रमाणपत्र मिळविणे या सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. याशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, चॅटबॉटद्वारे मार्गदर्शन आणि प्रमाणपत्र ई-मेल आणि व्हॉट्स अॅपवर मिळण्याची सुविधाही असेल.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुधारित शुल्क

शैक्षणिक प्रयोजनासाठी – 100 रुपये

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी – 500 रुपये

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी- 1000 रुपये

नोकरी आणि सेवाविषयक प्रयोजनासाठी- 1000 रुपये

शासकीय योजनांचा लाभ आणि सवलतींसाठी- 1000 रुपये