अमेरिकेत आलेल्या वादळाने विमानसेवा कोलमडली; 150 उड्डाणे रद्द, 6 हजार विमाने उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत खराब हवामान आणि वादळाचा जबर फटका विमानसेवेला बसला आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर आलेल्या वादळामुळे अमेरिकेतील सहा हजारांहून अधिक विमाने उशिराने उड्डाण करत असून जवळपास 1450 विमाने रद्द करण्याची वेळ आली आहे. यामुळे विमानाने प्रवास करणाऱया प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागले आहेत.

वादळामुळे समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे अनेक किनारी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मियामी एअरपोर्टवर एक मालवाहू विमान धावपट्टीच्या पुढे गेल्याने काही काळ विमानांची वाहतूक थांबवावी लागली.

खराब हवामानामुळे न्यूयॉर्पमध्ये होणारी प्रसिद्ध थँक्सगिव्हिंग डे परेड शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.