
बँकॉकमधून अपहरण करण्यात आलेल्या दोन हिंदुस्थानी नागरिकांची सुखरूप सुटका केली. एका टोळीने त्यांचे अपहरण करून त्यांना एका घरात पैद करून ठेवले होते. त्यांच्याकडून इतर देशांमध्ये तस्करी करण्यासाठी गांजा पॅक करून घेतला जात होता. काम करण्यास नकार दिल्यास त्यांना लोखंडी रॉड आणि फावडय़ाने मारहाण केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणात पाच हिंदुस्थानी नागरिकांना अटक केली आहे.
टँकरला आग, 31 जणांचा मृत्यू
इजिप्तची राजधानी पैरोच्या जवळ महामार्गावर बुधवारी रात्री तेलाच्या टँकरला आग लागली. तेलाने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन उलटल्याने ही आग लागली. या आगीत 31 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 21 हून अधिक जण जखमी झाले. आगीजवळ असलेल्या दोन डझनहून अधिक कार आणि दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाल्या. स्फोटाची घटना कारच्या डॅशपॅमेऱ्यात पैद झाली.
हरयाणात चार तरुणांची हत्या
हरयाणातील रोहतकमध्ये बुधवारी रात्री एक वाजता चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे चौघे खरावड गावातील मिलन हॉटेलमध्ये जेवण करत होते. हत्या झालेले चारही तरुण बाबा टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मृतांची ओळख झज्जरमधील डीघल गावातील रहिवासी रिंपू, विनीत, यश ऊर्फ गंजू आणि बेरी येथील रहिवासी हिमांशू अशी झाली आहे.



























































