
आपल्या लेकाला वाढदिवसाला खास भेट द्यावी असे पालकांना वाटत असते. मध्य प्रदेशातील सतना येथील एका व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या लेकाला त्याची वाढदिवसाची भेट म्हणून चक्क चंद्राचा तुकडा दिला आहे. याचाच अर्थ चांदोमामाच्या गावावर चिमुरड्याचे नाव झळकले आहे.
सतना येथील भरहुतनगर येथे राहणारे अभिलाष मिश्रा बंगुळुरूतील एका पंपनीत रिजनल मॅनेजर पदावर काम करतात. लोक चंद्रावर जमीन खरेदी करत आहेत याची माहिती त्यांना ऑफिसमध्ये मिळाली. त्यानंतर त्यांनीही चंद्रावर जमीन खरेदी करण्याचे ठरवले.
अमेरिकेची लुना सोसायटी इंटरनॅशनल नावाची कंपनी चंद्रावर जमीन विकण्याचे काम करते. मिश्रा यांनी या पंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना असे सांगण्यात आले की, चंद्रावर अशा 12 जागा आहेत जिथे आपल्या आवडीनुसार जमीन खरेदी करता येईल. पंपनीच्या वेबसाईटवर प्रत्येक जागेच्या वेगवेगळ्या किमती दाखवण्यास आलेल्या आहेत.
मिश्रा यांनी लूनर अल्पस येथे मुलाच्या नावावर एक एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रक्कम भरल्यानंतर त्यांना जमिनीची कागदपत्रे देण्यात आली. या कागदपत्रांसह दोन वर्षांच्या मुलाला चंद्राचे नागरिकत्वही मिळाले आहे. सुरुवातीला मिश्रा यांनी कुटुंबातील कुणालाही या अनोख्या गिफ्टबद्दल सांगितले नव्हते. जेव्हा त्यांच्या पत्नीला ही गोष्ट समजली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.

























































