
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना शाखा क्र. 20 पुरस्कृत धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल 125 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.
धर्मवीर मित्र मंडळ यांच्या विद्यमाने दरवर्षी शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात विभाग क्र. 2 चे विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा प्रमुख राजू खान, विधानसभा संघटक राजन निकम, युवासेनेचे अभिषेक शिर्पे, नगरसेवक सचिन पाटील, उपविभागप्रमुख श्याम मोरे, मनोज मोहिते, प्रदीप वस्त तसेच विधानसभा संघटक सविता देसाई, उपविभाग संघटक आकांक्षा नागम, सायली सुगधरे, सीमा लोकरे आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन उपविभागप्रमुख व धर्मवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत नागम, शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी केले होते.
प्रबोधन गोरेगाव संचालित माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या वतीने आयोजकांचा संस्थेचे संस्थापक-शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रक्तपेढीचे व्यवस्थापक रमेश इस्वलकर उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संजय साळवी, सुनील डिंगणकर, संतोष वरटे, ओमकार उतेकर, प्रदीप शिंदे, अशोक परब, विलास आंब्रे, गजानन कोकाटे यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.




























































