
सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क
कोणाचं नशीब कधी फळफळेल हे काही सांगता येत नाही आणि नशिबात असेल तर तेही कुठे जात नाही. असाच काहीसा अनुभव अमेरिकेतील एका जोडप्याला आला आहे. या जोडप्याने महिन्याभरापूर्वी लॉटरीच तिकीट काढल होतं. नंतर ते कुठे ठेवले ते त्यांना आठवतच नव्हतं. पण काही दिवसांपूर्वी घराची साफ सफाई करताना कचऱ्यात ते तिकीट सापडलं. सहज म्हणून वेबसाईटवर लॉटरीचा निकाल पाहीला आणि त्यांना आनंदाचा धक्काच बसला. तब्बल 12 कोटी 68 लाखांचं घसघशीत बक्षिस त्यांना लागलं होतं.
हे जोडपे लुय़िसियाना शहरात राहत असून हॅरोल्ड आणि टीना असे त्यांचे नाव आहे. त्यांना 12 कोटी 68 लाखांच बक्षिस जरी लागलं असलं तरी त्यांच्या हातात टॅक्स कापून 9 कोटी रुपयेच पडणार आहेत. विशेष म्हणजे बक्षिसाची तारीख संपवायला अवघे 10 दिवस शिल्लक असताना त्यांना हे तिकीट सापडलं. यामुळे आम्हांला श्रीमंत करण्याची देवाचीच इच्छा होती असे हॅरोल्ड आणि टीना सगळ्यांना सांगत आहेत.



























































