लेकासाठी बाप शार्कशी भिडला

ऑस्ट्रेलियात शार्कच्या तावडीत सापडलेल्या 16 वर्षिय मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील थेट पांढऱया शार्कसोबत भिडले. कोणतेही हत्यार न वापरता पित्याने लेकाला शार्कच्या तावडीतून सोडवले. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या एका समुद्रकिनारी ही घटना घडली. नाथन नेस हा 16 वर्षांचा मुलगा आणि त्याचे वडील मायकेल नेस हे दोघे बोटीमध्ये होते. त्यांची बोट किनाऱयापासून दोन मैल दूर होती. अचानक एका महाकाय पांढऱया शार्कने त्यांच्या बोटीवर हल्ला केला. पण बापाने मुलाला शार्कच्या तावडीतून वाचवले.