अंधेरी येथील गोखले पूल रखडल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनचालकांचे हाल होत असल्याने पालिकेने काम रखडवणाऱ्या पंत्राटदाराला तीन कोटींचा दंड ठोठावला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यानंतर पंत्राटदाराने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 105 दिवस सोडून 59 दिवसांच्या रखडपट्टीसाठी हा दंड ठोठावल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गोखले पुलाच्या कामात तांत्रिक अडचणी आल्याने गोखले पूल आणि बर्फीवाला पूल दोघांत 2.8 मीटरचे अंतर वाढले. त्यामुळे दोन पूल जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे पालिकेला मोठय़ा प्रमाणात टीका झाली. त्यामुळे पालिकेने ‘फॅक्ट फाइंडिंग कमिटी’ स्थापन करून पुलाची रखडपट्टी, बर्फीवाला पूल जोडण्यातील समस्यांचा शोध घेऊन जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.
असे होणार काम
दोन्ही पूल जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र दुसरा गर्डर बसवण्याची मुदत हुकल्याने आता काम 6 महिने आणखी लांबले आहे. कामासाठी आता 14 नोव्हेंबर ही नवी डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी पुढील वर्ष उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले.
या पुलाची एक लेन 26 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली असून हा पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अंधेरीसह सांताक्रुझ ते जोगेश्वरी आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककाsंडी पह्डण्यास मोठी मदत होणार आहे.