आयआयटीत संशयास्पद मृत्यू

आयआयटी गुवाहाटीतील बी टेक सायन्सच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी वसतिगृहात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. रॅगिंगनंतर हत्या झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे, तर पोलिसांनी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृत सौरभ (वय 20) हा बिहारमधील समस्तीपूर जिह्यातील मोहनपूर गावचा रहिवासी होता.