
‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध अर्थविषयक पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी 2026-27 या काळात जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण, मार्पेट व्रॅश होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही घसरण ऐतिहासिक ठरू शकते आणि ती ‘महामंदी’सारख्या आर्थिक संकटाची पुनरावृत्ती ठरू शकते, असे रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटलंय. मात्र गुंतवणूकदारांनी अशा घसरणीने घाबरून जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
कियोसाकी यांनी ‘एक्स’वर पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ही येऊ घातलेली आर्थिक पडझड मोठय़ा मंदीला कारणीभूत ठरू शकते आणि हे समजून घेणे आवश्यक आहे. याशिवाय स्वतःचेच उदाहरण देत पुढे म्हणाले की, ‘जेव्हा जेव्हा जगाने आर्थिक पडझड किंवा मंदी अनुभवली आहे तेव्हा मी अधिक श्रीमंत झालो, असे त्यांनी म्हटले.
गुंतवणूकदारांनी सावध रहावे
28 एप्रिल 2026 रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. वाढते कर्ज, पैशाच्या पुरवठय़ातील वाढ आणि जागतिक शेअर बाजारातील अनिश्चितता या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून शेअर बाजार आणि इतर मालमत्ता वर्गांमध्ये मोठी व तीव्र घसरण होऊ शकते, असे त्यांचे मानणे आहे. गुंतवणूकदारांनी अशा घसरणीकडे भीतीने पाहू नये, यावर त्यांनी भर दिला आहे.



























































