उत्तर प्रदेशमधील कौशांबी येथे एका फाटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. स्फोट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग पसरली आणि या आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजणं गंभीर जखमी झाले आहेत.
सदर घटना कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवारी येथे घडली आहे. फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. या आगीत होरपळून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मांझनपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवनारायण, कौसर अली, शाहिद अशी या भयानक स्फोटात मृत्युमुखी मृतांची नावे आहेत. तर अन्य एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार शराफत अली असे कारखान्याच्या मालकाचे नाव आहे. स्फोट कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.