सरकारच्या शैक्षणिक -रोजगार धोरणाविरोधात राजुरात मोर्चा; नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा निषेध

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात राज्य सरकारच्या शैक्षणिक -रोजगार धोरणाविरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राजुरा उपविभागातील शेकडो युवक युवती सहभागी झाले. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणारा काळा जीआर मागे घ्या आणि सरकारी शाळा कॉर्पोरेट घराण्यांना दत्तक देत छुप्या खाजगीकरण रद्द करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणारा काळा जीआर आणि सरकारी शाळा कॉर्पोरेट घराण्यांना दत्तक देत छुप्या खाजगीकरणाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. राजुरा शहरातील संविधान चौकातून सुरुवात होत शहरातील प्रमुख मार्गांनी फिरुन हा मोर्चा राजुरा तहसील कार्यालयावर धडकला. पूरोगामी विचार मंच व संबंधित संघटनांच्यावतीने भव्य जन आक्रोश मोर्चाने शहर दणाणून गेले होते.