72 लाखांचे सोने घेऊन नोकर पसार

9 महिन्यांपूर्वी कामाला लागलेल्या नोकराने 72 लाख रुपयांचे सोने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्याच्या अटकेसाठी एक पथक तयार केले आहे.  तक्रारदार हे सोने व्यावसायिक आहेत. त्याच्या कारखान्यात सोन्याचे दागिने हॉल मार्ंकग केल्यावर डिलिव्हरीसाठी पाठवले जातात. नारायण उद्योग येथील कारखान्यात एक नोकर नऊ महिन्यांपासून काम करत होता. तो सोने डिलिव्हरीचे काम करायचा. शनिवारी नेहमीप्रमाणे कामगार कारखान्यात आले. एका नोकराने ड्रॉवर उघडला असता त्यात दोन पाकिटे दिसली नाहीत. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सकाळच्या सुमारास नोकर हा त्या ड्रॉवरमधून सोन्याची पाकिटे घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीत पैद झाले. तसेच फरार नोकराने कारखान्याच्या चाव्या जागेवर ठेवल्या. त्यानंतर तक्रारदार याने नोकराला पह्न केला. तेव्हा त्याचा पह्न बंद होता. चोरी प्रकरणी तक्रारदाराने काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेतली.