मैदानात आळस देणाऱ्या सरफराजची नेटिझन्सने उडवली टर, पाहा मजेशीर ट्वीट

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानविरुद्धच्या लढतीदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सरफरराज अहमद ट्रोल झाला आहे. यष्ट्यांमागे आळस देणाऱ्या सरफराजची नेटिझन्सने टर उडवली आहे. नेटकऱ्यांनी ट्विवटरवर सरफराजच्या त्या कृतीची खिल्ली उडवली असून यावर मीम्सही बनवले आहेत.

हिंदुस्थानची फलंदाजी सुरू असताना 47 व्या षटकात अचानक पावसाला सुरुवात झाली. अर्धा तासाच्या ब्रेकनंतर खेळाडू पुन्हा मैदानात उतरले. ब्रेकनंतर मैदानात उतरेला पाकिस्तानचा कर्णधार आळसावलेला दिसून आला. यष्ट्यांमागे आपली जागा सांभाळल्यानंतर सरफराजने आळस दिला. हा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि नेटिझन्सने यावर निशाणा साधला.