
1 अनेक ठिकाणी ओळख किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड देण्यात येते. त्याच्याशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक बंद झाला असेल तर मोठी अडचण होऊ शकते.
2 अनेदा आधार पडताळणी ही ओटीपीद्वारे केली जाते. तुमचा नंबर बंद झाला असेल तर नवीन नंबर आधारशी लिंक करणे अतिशय आवश्यक आहे. ही प्रक्रिया सोपी आहे.
3 यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला आधार अपडेट अर्ज भरावा लागेल. नवीन मोबाइल नंबर आधारशी जोडायचा आहे, हे नमूद करावे.
4 तुमची बायोमेट्रिक पडताळणी करण्यात येईल. या प्रक्रियेसाठी 75 रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यानंतर तुम्हाला एका विशिष्ट क्रमांकासह त्याची पावती मिळेल.
5 काही दिवसांमध्ये तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करण्यात येईल. तसा तुम्हाला एसएमएसदेखील येईल. तुमच्या अर्जाचे स्टेटस तुम्ही ऑनलाइनदेखील तपासू शकता.


























































