प्रभासच्या आदिपुरुषला 2022चा मुहूर्त

ओम राऊत दिग्दर्शित प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आदिपुरुष या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आज निर्मात्यांनी जाहीर केली आहे. 11 ऑगस्ट 2022 ला हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होत आहे. यात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे. टी सिरीजची निर्मिती असलेला हा चित्रपट सध्या प्री प्रॉडक्शन स्टेजला असून जानेवारी 2021 पासून शूटिंगला सुरुवात होणार आहे. प्रभास आणि सैफ यांच्यासह या बिग बजेट चित्रपटात कुणाची वर्णी लागणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या