आदित्य ठाकरे यांनी केली आरेच्या जंगलाची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरेमधील 600 एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्या भागातील जंगलाची पर्यावरण मंत्र्यांनी पाहणी केली.

पर्यावरणाचे रक्षण व पर्यटनाच्या विकासासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या परिसराचा दौरा केला. यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये, दुग्धविकास आयुक्त भांगे उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिक वल्सा नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील सोबत मालाड (पश्चिम) मधील एरंगळ येथील एमटीडीसीच्या जागेची पाहणी केली. मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येईल असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले