
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे नुतनीकरण, पेंग्विनसह नवीन आलेल्या नवीन पक्षी-प्राण्यांमुळे मुंबईकर- पर्यटकांची गर्दी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी आणखी अनोख्या योजना सुरू करण्यात येतील. यामध्ये पक्षी-प्राण्यांचे ब्रिडिंग-संवर्धन आणि रेस्क्युड अॅनिमल पुनर्वसन केंद्र सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.
राणी बागेत आतापर्यंत केवळ पिंजर्यातले प्राणी पाहता येत होते. मात्र आता ही कॉन्सेप्ट बदलली असून नव्या पद्धतीत पक्षी-प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करून त्यांचे संवर्धन सुरू असल्याचे असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. नव्या बिबट्या, तरस यांच्या, कोल्हा, अस्वल आणि पक्षी विहारामुळे पर्यटकांचे आकर्षण आणखी वाढेल असेही ते म्हणाले. मुंबईत यापुढे पर्यटकांसाठी अशाप्रकारे आणखी उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. हा प्रकल्प राबवण्यासाठी मेहनत घेणारे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, सुधीर नाईक यांचेही कौतुक केले.





























































