
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याची आई झीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झीनत हुसेन या दिवाळीनिमित्त आमीर खानसोबत त्याच्या पाचगणी येथील फार्म हाऊसवर गेल्या होत्या. तिथे त्यांना छातीत दुखू लागल्याने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तिथून त्यांना ब्रिच कँडीला हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.































































