…आता ठग आमीर खान दाखवणार रस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कुठल्याही अनोळखी ठिकाणी जायचं म्हटलं की हल्ली गुगलमॅपचा सर्रास वापर केला जातो. हा मॅप आपल्याला हवे त्या ठिकाणी पोहचवतो. मात्र आता यापुढे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट गुगलसोबत आपल्याला रस्ता दाखवायला मदत करणार आहे. आमीर खानचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांनी गुगल मॅप्सची मदत घेतली आहे. त्यामुळे आता गुगल मॅप्सच्या रस्ता दाखविणाऱ्या अॅरोच्या जागी आता ठग्स ऑफ हिंदोस्तानमधील फिरंगी मल्लाह आपल्याला दिसणार आहे. अॅण्ड्रॉईड आणि आयओएस प्रणाली असलेल्या मोबाईलधारकांना गुगल मॅप्सवर फिरंगी मल्लाह दिसणार आहे.

aamir-khan-navigation

‘ठग्स ऑफ हिंदोस्तानला प्रमोट करण्यासाठी आम्ही काही वेगळ्या प्रकारे मार्केटींग करण्याचे ठरवले होते. त्यामुळे आम्ही गुगल मॅपला यात आमचे पार्टनर केले. गुगल मॅप हे हल्ली सर्रास वापरले जाते आणि प्रवास करणारे त्याचा सर्वात जास्त वापर करत असतात. घोड्यावर बसलेला फिरंगी नक्कीच गुगल मॅपच्या युजर्सला आवडेल याची आम्हाला खात्री आहे, असे यशराज फिल्म्सचे मार्केटींग विभागाचे उपाध्यक्ष मनान मेहता यांनी सांगितले.

summary : Aamir Khan will help people navigate as Firangi Mallah