
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून आम आदमी पक्षाने या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली आहे. काँग्रेसही प्रचारावर जोर देत आहे. अशातच आपचे नेते संजय सिंग यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपच्या एका उमेदवाराचे अपहरण केल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला असून भाजपची गुंडगिरी आम्ही समोर आणत असल्याचा दावा केला आहे.
चौंकाने वाले सबूत‼️
BJP के नेता, जिनका संबंध सीधे Gujarat के मुख्यमंत्री से है, वो AAP के Surat (East) के Candidate के अपहरण में शामिल है!
-AAP MP @SanjayAzadSln#BJPKidnapsAAPCandidate pic.twitter.com/Wb7ijqQ66W
— AAP (@AamAadmiParty) November 16, 2022
‘आप’ने आरोप केला आहे की, गुजातमधील सुरत येथील पूर्व मतदारसंघातून निवडणूकीसाठी त्यांनी दिलेले उमेदवार कांचन जरिवाला यांचं भाजपने अपहरण केलं आहे. जरिवाला कालपासून त्यांच्या परिवारासह गायब असल्याचं आपनं म्हटलं आहे. गुजरातमध्ये निवडणुकीत पराभवाच्या भितीनं भाजप अस्वस्थ आहे आणि त्याच कारणानं उमेदवाराच्या अपहरणाचा निर्णय घेतल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे.
‘कांचन आणि त्यांचा परिवार कालपासून गायब आहे. ते आपल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यासाठी गेले असताना कार्यालयातून बाहेर पडल्यावर भाजपच्या गुंडानी कांचन यांचं अपहरण केल्या आरोप आपने केला आहेत. आता कांचन कोठे आहेत, याची कोणताही माहिती आमच्याकडे नाही’, असेही सिंग म्हणाले.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर तर 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

























































