
आम आदमी पक्षाने सोमकारी विधानसभा निवडणुकीसाठी आठ उमेदकारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत उच्चशिक्षित उमेदवार असून सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक यांना प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहे. ब्रह्मपुरीतून (जि. चंद्रपूर) पारोमिता गोस्वामी (एल्गार आंदोलनाच्या नेत्या), जोगेश्वरी पूर्वमधून विठ्ठल गोविद लाड (कष्टकरी शेतकरी संघटना), कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव (बालरोगतज्ञ), नाशिकच्या नांदगावमधून विशाल वडघुले (ऑटो मेकॅनिक), पुण्यातील कोथरूड विधानसभेतून अभिजित मोरे (जनआरोग्य अभियान कार्यकर्ते), चांदिलीतून सिराज खान (उद्योजक), दिंडोशीतून दिलीप तावडे (उद्योजक), पुण्याच्या पर्वकती मतदारसंघातून संदीप सोनवणे (बचत गट चळवळ कार्यकर्ते) यांना उमेदवारी दिली आहे.





























































