
दिल्लीत विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापूर्वीच दिल्लीत राजकारण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या 1 हजार 675 कुटुबीयांना स्वाभिमान फ्लॅट्सच्या चाव्या दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आप सरकारव टीका केली होती. आता केजरीवाल यांनी मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.
केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की मोदी यांनी 43 मिनिट भाषण केलं, त्यापैकी 39 मिनिटं फक्त दिल्लीचे लोक आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारवर टीका केली. 2015 साली दिल्लीच्या जनतेने दोन सरकारं निवडून दिली होती. दिल्ली हे स्वायत्त राज्य नाही, दिल्लीची जनता ही दोन सरकारं निवडून देता. काही मुद्दे हे एका सरकारच्या अंतर्गत येतात तर काही मुद्दे दुसऱ्या सरकारच्या अंतर्गत येतात.
केजरीवाल म्हणाले की दिल्लीच्या सरकारने दोन सरकारं निवडून देली होती. केंद्रात भाजपचे आणि दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार निवडून दिले. या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झाले. या दहा वर्षात आप सरकारने भरपूर काम केले. पण आपलं जे दूसरं सरकार आहे भाजपचं केंद्र सरकार त्यांनी गेल्या 10 वर्षात एकही असे काम केले नाही की पंतप्रधा मोदी आपल्या 43 मिनिटांच्या भाषणात सांगू शकतील.
केजरीवाल म्हणाले की आज पंतप्रधान मोदींनी सांगितले की दिल्लीत संकट आले आहे. पण संकट दिल्लीवर नाही तर भाजपवर आले आहे. पहिले संकट हे भाजपकडे दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. दुसरे संकट की दिल्लीत निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे मुद्दे नाहीत. आणि तिसरे संकट हे की भाजपकडे अजेंडा नाही. आम्ही फक्त दिल्लीच्या नागरिकांचा फायदा बघतोय. जर केंद्र सरकारच्या योजनेमुळे दिल्लीकरांचे कल्याण होत असेल तर आम्ही करू, जर आमच्या योजनेमुळे जनतेला फायदा होत असेल तर तो करू, तुमची योजना आमची योजना असा भेद आम्ही करत नाही असेही केजरीवाल म्हणाले.






























































