
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना गुरुवारी श्रीनगरमध्ये नजरकैद करण्यात आले. त्यांना विश्रामगृहाबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याशी त्यांची भेटही होऊ दिली गेली नाही. केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीचा संजय सिंह यांनी तीव्र निषेध केला आहे.
‘आप’चे जम्मू-काश्मीरमधील एकमेव आमदार मेहराज मलिक यांना जनसुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. ही अटक बेकायदा असल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे. याच संदर्भात पत्रकार परिषद घेण्यासाठी संजय सिंह श्रीनगरमध्ये आले होते. मात्र, त्यांना पोलिसांच्या पहाऱयात विश्रामगृहातच डांबण्यात आले. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या फारुख अब्दुल्ला यांनाही पोलिसांनी अडवले. सिंह यांनी विश्रामगृहाच्या गेटवर चढून अब्दुल्ला यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.