
दोन समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह आणि द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी मऊच्या एमपी/एमएलए न्यायालयाने शनिवारी अब्बास अन्सारी याला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यावर आज उत्तर प्रदेश विधानसभा सचिवालयाने तातडीने अब्बास अन्सारी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले आणि त्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर केली. अब्बास अन्सारी माफिया मुख्तार अन्सारी याचा मुलगा आहे.
न्यायालयाने शनिवारी अब्बासला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने लागलीच जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला लागलीच जामीनही मिळाला. मात्र, न्यायालयाचा आदेश जारी झाल्यानंतर 24 तासांच्या आत महू येथून फाइल लखनौला पोहोचली आणि त्यानंतर आज विधानसभा सचिवालय उघडण्यात आले. विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप दुबे यांनी अब्बास याचे सदस्यत्व रद्द करण्याचा आणि जागा रिक्त घोषित करण्याचा आदेश जारी केला. यासोबतच पोटनिवडणूक घेण्याचा प्रस्तावही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला.
विरोधी पक्षात असल्याने आमदारकी गमावली
अब्बास हा माफिया मुख्तार अन्सारीचा मुलगा आहेत. सपाच्या पाठिंब्याने तो सुभाषपाच्या तिकिटावर आमदार झाला. अब्बास हा सपाचा आमदार मानला जात होता. तो विरोधी पक्षाचा असल्याने सरकारने आजच त्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा आणि जागा रिक्त घोषित करण्याचा आदेशला स्थगिती मिळवली असती तर ही जागा रिक्त घोषित करता आली नसती. दरम्यान, माझ्या बोलण्याने काहीही नवीन होणार नाही. आमची बाजू काहीही असो, आम्ही ती न्यायालयात मांडू, असे अब्बास अन्सारी म्हणाला.