हिंदी ‘बिग बॉस’मध्ये अभिजीत बिचुकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस’ मराठीचा दुसरा सीझन गाजवणारे अभिजीत बिचुकलेची आता हिंदी ‘बिग बॉस’मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. बिचकुले सोबतच अभिनेत्री रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी हेदेखील बिग बॉसमध्ये आले आहेत. याचे प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. ‘वीकेंड का वार स्पेशल’ला आलेले महेश मांजरेकर यांनी ‘बिग बॉस 15’चा सूत्रसंचालक सलमान खानला अभिजीतविषयी सांगितले. त्यांनी सांगितलं की अभिजीतने ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा नकाशा बदलून टाकला होता.

अभिजीत बिचुकले हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये होता. बिचुकले साताऱयाचे असून त्याने अनेक निवडणुका लढवल्या आहेत. तो स्वतःला कलाकार, लेखक, कवी, गायक आणि संगीतकार म्हणवतो. बिचुकले एकदा तुरुंगातही गेला. ‘बिग बॉस मराठी’च्या सेटवरून त्याला 2019 साली अटक करण्यात आली होती. चेक बाऊन्सच्या प्रकरणात तो अडकला होता. ‘बिग बॉस 15’ च्या घरात संस्कार द्यायला आलो आहे, असे धक्कादायक विधान करून बिचुकले सुरुवातीलाच साऱयांचे लक्ष वेधून घेतले आहे.