महिलांविरुद्ध अशी भाषा? अभिजित अय्यर-मित्र यांना कोर्टाचा खरमरीत सवाल, Newslaundry च्या विरोधातील पोस्ट हटविणार

Delhi High Court Warns Abhijit Iyer-Mitra Over Offensive Posts Against Women Journalists, Gives 5 Hours to Delete Tweets

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राजकीय कमेंट्रेटर अभिजित अय्यर-मित्र यांना इशारा दिला की जर त्यांनी न्यूजलॉन्ड्रीच्या कार्यकारी संपादक मनीषा पांडे आणि इतर आठ महिला पत्रकारांना लक्ष्य करणाऱ्या कथित बदनामीकारक पोस्ट हटवल्या नाहीत तर त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करतील. न्यायालयाने त्यांना बदनामीकारक पोस्ट हटवण्यासाठी पाच तासांचा वेळ दिला आहे. (Delhi High Court Warns Abhijit Iyer-Mitra Over Offensive Posts Against Women Journalists, Gives 5 Hours to Delete X posts)

फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान एक्स वर केलेल्या पोस्ट बद्दल बोलताना न्यायालयाने म्हटले की, ‘कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशी स्वीकारार्ह होणार नाही’. न्यायालयाने म्हटले होते की न्यायालय अंतरिम आदेश देण्यास इच्छुक आहे परंतु अय्यर-मित्र यांच्या वकिलांनी दिलेल्या वेळेत पोस्ट डिलिट केल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर पुढील पाऊल उचलण्यात आलेले नाही.

पत्रकारांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. तक्रारदारांनी आरोप केला आहे की अय्यर-मित्र यांनी त्यांना ‘वेश्या’ म्हणून संबोधले आणि त्यांचे कामाचे ठिकाण, न्यूजलॉन्ड्री ‘वेश्यालय’ म्हणून वर्णन केले. या प्रकरणी लेखी माफी आणि 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागण्यात आली आहे.

न्यायालयात सुनावणी दरम्यान, ‘प्रसंग काहीही असो मात्र महिलांविरुद्ध अशा प्रकारची भाषा वापरण्यास समाजात परवानगी आहे का?’ असा खरमरीत सवाल करण्यात आला.

‘एक संवैधानिक न्यायालय म्हणून आम्ही प्रतिवादीविरुद्ध फौजदारी FIR नोंदवण्याचे आणि त्याला ताब्यात घेण्याचे आदेश देऊ शकतो’, असा इशारा न्यायालयाने दिला. ‘जर ही अशी भाषा असेल, तर तुम्ही त्या पोस्ट काढून टाकत नाहीत?’, असे देखील विचारण्यात आले.

सुनावणीच्या वेळी, आधीच्या सूचना नंतरही आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यात आले नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

अय्यर-मित्र यांच्या वतीने न्यायालयात सादर केलेले निवेदन वकील जय अनंत देहद्राई यांनी केले होते. या निवेदनात म्हटले होते की अभिजित अय्यर-मित्र यांना वेगळे मुद्दे उपस्थित करायचे होते. मात्र त्याच वेळी, देहद्राई यांनी मान्य केले की ‘ज्या प्रकारचे शब्द पोस्टमध्ये वापरण्यात आले आहेत ते टाळता आले असते’. देहद्राई यांनी न्यायालयाला सांगितले की अय्यर मित्र पाच तासांच्या आत आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकतील.