नगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी महापौर अभिषेक कळमकर शिवबंधनात

नगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक मानले जाणारे कळमकर यांनी नगरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा खांद्यावर घेतला. कळमकर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे.

Video – उद्धव ठाकरे यांची नगरमध्ये जाहीर सभा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षप्रमुख यांची नगरमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली. याच सभेमध्ये कळमकर यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवसेनमध्ये स्वागत केले.

अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि नगरचे माजी आमदार दादा कळमकर यांचे पुतणे आहेत. नगरचे महापौरपदही त्यांनी भूषवले आहेत. तरुण वर्गामध्ये त्यांची मोठी क्रेझ असल्याने त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला आमखी भक्कम होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या