मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी आजपासून

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया उद्या 25 मेपासून सुरू होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. हे संकेतस्थळ 25 मे संध्याकाळी 5 नंतर उपलब्ध होणार आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक ः

अर्ज विक्री (संबंधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन) – 25 मे ते 10 जून (दुपारी 1.00 वाजेपर्यंत) n प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 25 मे ते 10 जून n ऑनलाईन अॅडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – 25 मे ते 10 जून n पहिली मेरीट लिस्ट – 13 जून, (संध्याकाळी 5.00 वाजता) n ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 14 जून ते 20 जून (दुपारी 3.00 वाजेपर्यंत ) n द्वितीय मेरीट लिस्ट – 21 जून (संध्याकाळी 5.00 वाजता) n ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – 22 ते 27 जून, (दुपारी 3.00 वाजेपर्यंत) n तृतीय मेरीट लिस्ट – 28 जून, ( संध्याकाळी 5.00 वाजता) n ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे –29 जून ते 3 जुलै (दुपारी 3.00 वाजेपर्यंत) n कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन- 4 जुलै.