सहायक प्रशासन अधिकाऱ्याला सव्वा लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा बदली झाल्यानंतर शिक्षकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश काढून देणे करीता मागितलेल्या लाचेप्रकरणी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अशोक कुकलारे (41) यांना एक लाख वीस हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. संजय विट्ठल ढमाले (39), निवृत्ति नींबा भूले (34) या दोन प्राथमिक शिक्षक दलालांनाही अटक करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यारी व प्राथमिक शिक्षक यांना शिक्षक दिनाच्या दिवशी पकडले गेल्याने शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला आहे. अशोक कुकलारे यांच्या टेबलाची तपासणी केली असता अजून दोन लाख साठ हजार रुपये रोकड रक्कम सापडली असून ती जप्त केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झाली होती. तक्रारदार याची आंतरजिल्हा बदली झाली असल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कार्यमुक्त आदेश पाहिजे होता. तो आदेश देण्यासाठी आरोपी अशोक कुकलारे यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजाराची लाचेची मागणी केली होती व सदर रक्कम संजय ढमाले व निवृत्ती भुले यांच्याकडे देण्यास सांगितले होते. तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग येथे लाचलुचपत विभागाशी संपर्क करून तक्रार दाखल केली. त्यानुसार आज 5 सप्टेंबर रोजी डीवायएसपी अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदमध्ये सापळा लावण्यात आला. अशोक कुकलारे यांना व एजंट प्राथमिक शिक्षक संजय विट्ठल ढमाले व निवृत्ति नींबा भूले या तिघांना 1 लाख 20 हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत पथकाने रंगेहाथ पकडले.