अमरावतीत दुचाकींचा अपघात, तीन जणांचा मृत्यू

accident

अमरावती जिल्ह्यात दोन दुचांकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वलगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शिरळा-पुसदा मार्गावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. दोन दुचाकी परस्परावर आदळल्यामुळे हा अपघात रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडला. अपघातात गौतम नागोराव वानखडे (35), राज प्रल्हाद गायकवाड (52, रा. पुसदा) व पोलीस हवालदार वसंत हुलसिंग जाधव (53) यांचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री गौतम वानखडे व राज गायकवाड हे अॅक्टीव्हाने पुसद्यावरून शिराळा येथे जात होते, तर विरुद्ध दिशेने चांदूर बाजारहून पोलीस जाधव येत होते. त्यावेळी दोन्ही गाड्यांची एकमेकांसमोर धडक बसली. त्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अधिक तपास वलगाव पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या