नगर- सोलापूर महामार्गावर अपघात; तिघांचा मृत्यू, 5 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर- सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी शिवारामध्ये एसटी बस व चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे नगर-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. अक्कलकोट येथून नगरकडे येणारी एसटी बस अंबिलवाडी शिवाराजवळ आली असता समोरून येणाऱ्या झायलो गाडीला धडकली. या अपघातात झायलो गाडीचे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.तर पाच जण जखमी झाले आहेत. पोलीसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयांत पाठवले आहे.