
खेड-दापोली रस्त्यावर ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. ज्या ट्रकने धडक दिली तो ट्रक चिरे नेत होता. या ट्रकने आधी दुचाकीला धडक दिली आणि नंतर तो पुढे जाऊन उलटला. शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला असून याबाबतचे सविस्तर वृत्त अजून प्राप्त झालेले नाही.



























































