हैदराबादमधील साईभक्तांच्या लक्झरीला जामखेडमध्ये अपघात, दोन ठार

9
accident-common-image

सामना प्रतिनिधी । नगर

जामखेड-खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि हैदराबाद येथील साईभक्तांना घेऊन जाणार्‍या लक्झरी बसचा आजपहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच भर पावसात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या