नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-pune-accident

सामना प्रतिनिधी । नगर

नगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण फाट्यावर एका भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहे. पळवे पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा येथे आज पहाटे ५.३०च्या सुमारास ही घटना घडली.

संभाजीनगरहून पुण्याकडे जानाऱ्या ट्रॅव्हलने उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. यात पाच जण जागीच ठार झाले. दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ सुपा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह 7 पोलीस दल तसेच 108 रुग्णवाहिका, डॉ. विलास काळे, नरेंद्र मुळे, राजेंद्र घुले घटनास्थळी पोहचले. या अपघाताचे कारण स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे. प्रमोद उत्तम मोरे, महंमद आरेफ अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. अन्य तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, या अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले.