
कात्रज बाह्यवळणाहून नवले ब्रिजकडे जात असताना भरधाव मालवाहू ट्रकचा पुढचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांनी प्रपृती गंभीर आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत 4 मोटारी, एक टेम्पो, 8 दुचाकीसह 13 वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. हा अपघात सकाळी पावणेअकराच्या सुमारास पोतदार इंटरनॅशनल स्पूलच्या समोर घडला.
शुभम प्रकाश सुपेकर (वय 24, रा. आंबेगाव) असे ठार झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. प्रकाश अशोक आरख (वय 33, रा. उत्तमनगर), रवींद्र स्वामीलाल राहणे (वय 55, रा. कोंढवा धावडे), नागनाथ भारत इतनेव (वय 31, रा. कोंढवा), विलास सदाशिव जगताप अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर विठ्ठल तुकाराम झेंडे (वय 50), इंद्रभान हिराजी शिंदे (वय 70, सिंहगड), ऋतुराज इंद्रभान शिंदे (वय 39) अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.
असा झाला अपघात
कात्रज बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक सुरू असताना अचानक पाठीमागून आलेल्या ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकचालकाने आसपासच्या वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार ट्रकखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस तत्काळ दाखल झाले. त्यानंतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्रेनद्वारे अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर सुमारे सव्वा तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.


























































