पोलिसांना 10 वर्ष गुंगारा देणारा अटकेत; दत्तवाडी पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरूणावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या गुंडाला दत्तवाडी पोलिसांनी पकडले. मागील 10 वर्षांपासून तो फरार होता. अभिषेक जगन्नाथ भालेराव (वय 29,रा. पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी भालेराव, विशाल गायकवाड, पिंटू भालेराव, योगेश शिंगाडे आणि त्याच्या साथीदारांनी सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा भागात युवतीची छेड काढल्याच्या कारणावरुन वसंत कांबळे याच्यावर वार केले होते.

संबंधित गुन्ह्यात भालेरावच्या साथीदारांना पकडण्यात आले होते. मात्र, अभिषेक भालेराव पोलिसांना 10 वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. तो सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शिवाजी क्षीरसागर आणि राहुल ओलेकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. ही कामगिरी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, महेश गाढवे, राहूल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, शरद राउत, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे, अमित सुर्वे, विष्णू सुतार यांच्या पथकाने केली.