महिलेचा खून : कांही तासातच छडा, आरोपी बाबू चव्हाण यास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नळदुर्ग

येथील बबिता तुकाराम शिंदे या महिलेच्या खून प्रकरणाचा नळदुर्ग पोलीसांच्या वतीने कांही तासातच छडा लावला आहे. या खून प्रकरणी पुजारी तांडा येथील बाबू (बबन) पोमा चव्हाण (३५) यास पोलीसांनी ताब्यात घेतले असून आरोपीने खूनाची कबुली दिली आहे.

दिनांक ११ जुलैच्या रात्री नळदुर्ग येथील बबिता तुकाराम शिंदे (वय ३८) या महिलेचा खून करुन तिचा मृतदेह चिवरी पाटीजवळ एका खड्ड्यात फेकण्यात आला होता. या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून त्याच म्हणजे दिनांक १२ जुलैच्या पहाटे बाबू (बबन) पोमा चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीच्या सुरुवातीला आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली, मात्र पोलीसी खाक्या दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

बबिता आणि बाबू यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. या संबंधातून बबिता बाबूकडे पैशाची मागणी करीत होती. यातूनच या दोघांमध्ये वादावादी झाली. दिनांक ११ जुलै रोजी बाबू चव्हाण हा बबिताच्या घरी येवून तिला मोटारसायकलवर बसवून घेवून गेला. त्यानंतर बारुळ येथे नातेवाईकाच्या घरी जेवन करुन सायंकाळी गावी परत येण्यासाठी निघाले. सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास नळदुर्ग – तुळजापूर रस्त्यावरील बुस्टरजवळ हॉटेलमध्ये या दोघांनी चहा पिला. त्यानंतर संधी साधून बबनने बबिताचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी बाबू (बबन) पोमा चव्हाण याच्या विरुध्द नळदुर्ग पोलीसा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.