
हत्येसाठी विषारी साप दिल्याचा आरोप असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने 25 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.
गणेश खंडागळे असे या आरोपीचे नाव आहे. शाहापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. जून 2023मध्ये त्याला अटक झाली. जामिनासाठी त्याने याचिका दाखल केली होती. न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हत्या झालेल्या व्यक्तीचा मृत्यू सर्पदंशाने झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालेले नाही. विषारी सापाचा उपयोग हत्येसाठी झाला किंवा या सापाचा वापर हत्येसाठी होणार हे गणेशला ज्ञात होते हे खटल्यात सिद्ध होईलच. मात्र गेली दोन वर्षे गणेश कारागृहात आहे. तो पळून जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला जामीन मंजूर केला जात आहे, असे न्यायालयाने नमूद केले. ही घटना 3 जून 2023 रोजी घडली. रमेश मोरे, अरुण फर्दे व सोमनाथ जाधव यांनी पैशाच्या वादातून एकाची हत्या केली.