आरोपीचे कोर्टातून पलायन 

चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर वांद्रे पोलीस आरोपीला रिमांडकामी वांद्रे न्यायालयात घेऊन गेले. पण कोर्टरूमच्या बाहेर असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीने शिताफीने पळ काढल्याची घटना घडली होती. मात्र वांद्रे पोलिसांनी लगेच शोधाशोध करून त्या आरोपीला पुन्हा पकडले.

मोहम्मद शकिल अल्लाबक्ष शेख असे चोरीच्या गुह्यात वांद्रे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 12 व्या न्यायालयाच्या कोर्टरूमबाहेर असताना शकिलने संधी साधत सोबत असलेल्या अंमलदाराच्या हाताला झटका दिला आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याला शोधून पुन्हा अटक केली.