
1 जून 2013 रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या पतीला मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणातील आरोपी छोटेलाल कर्तारू गुप्ता (41) याला न्यायालयाने कलम 354 अन्वये दोन वर्षे सक्त कारावास व 10 हजार रुपये दंड, कलम 452 अन्वये दोन वर्षे सक्त कारावास व 10 हजार रुपये दंड, तसेच कलम 323 अन्वये तीन महिने कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंग आणि धारदार शस्त्राने हल्ला या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये मानखुर्द पोलिसांनी प्रभावी तपास करून सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले. तपासी अधिकारी, कोर्ट अंमलदार तसेच समन्स वॉरंट पथकाने केलेल्या प्रभावी कामकाजामुळे दोन्ही प्रकरणांत आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली. विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.




























































