
गोंदियाच्या खळबंधा गावात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर दोन अज्ञात इसमांनी अॅसिड फेकले. या हल्ल्यात ती तरुणी हि गंभीर जखमी झाली असून तिला गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी नेण्यात आले. मात्र तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले.
खलबंधा गावात रहाणारी आचल कळनबे हि नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत असून सुट्ट्यांसाठी काही दिवस आधीच ती स्वगावी परतली होती. बुधवारी ती नागपूरला जाण्याकरीत खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली असता. एका दुचाकी वाहनावर तोंडाला कापड बांधून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी आचलवर अॅसिड फेकले व ते तेथून पसार झाले. गावकऱ्यांनी या हल्ल्याची माहिती पोलिसांना देत पीडितेला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र आचलची प्रकुती बिघडत चालल्याने तिला पुढील उपचारा करिता नागपूरला हलविले. गंगाझरी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे




























































